14 December 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नामोनिशाण हटवलं; फडणवीसांविरोधात बंड?

BJP Leader panjaka Munde, Devendra Fadnavis

परळी: ‘पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत मी १२ डिसेंबरला सांगेन’, अशी फेसबुक पोस्ट भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली. याच दरम्यान पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी ट्विटरवरून भारतीय जनता पक्ष आणि माजी मंत्री ही ‘ओळख’ही हटवली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

परळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी धक्कादायक पराभव केला. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारही स्थानापन्न झाले. आता पुढची रणनीती काय? याविषयी पंकजा मुंडे 12 डिसेंबर म्हणजेच दिवंगत वडील गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरविणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर लिहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भारतीय जनता पक्षाची ओळखही हटवली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच विशिष्ठ समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजप व्यतिरिक्त नेतेमंडळींना पुढे करून भारतीय जनता पक्षातील मूळ नेते मंडळींना शीत्तबद्ध संपवत असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच पक्षात स्पर्धा करतील अशा नेत्यांविरुद्ध एक गट कार्यरत केला असून त्याला फडणवीसांचीच फूस असल्याची चर्चा भाजपात दबक्या आवाजात रंगली आहे. त्यामुळेच त्यांनी संधी मिळताच त्यांनी एकनाथ खडसे यांना एकाकी पाडलं तर अनेकांचं विधानसभा निवडणुकीत तिकीट कापून बाजूला केलं. तसेच सध्या राज्यात पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून परिचित आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत परळी विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी छुप्यामार्गाने धनंजय मुंडे यांना मदत केली अशी चर्चा रंगली आहे, तसेच फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे राजकीय संबंध असल्याचं देखील सर्वश्रुत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष भाजपात राहिल्यास त्यांची अवस्था एकनाथ खडसे यांच्यापेक्षा वेगळी होणार नाही तसेच सत्तेबाहेर राहून परळीत समर्थकांना थोपवून धरणे देखील कठीण होणार आहे. त्यामुळे त्या वेगळा विचार करत असल्याची राजकीय चर्चा रंगली असून त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x