16 May 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार
x

Special Recipe | अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी

Shengdana Mahadya recipe in Marathi

मुंबई, २९ जुलै | महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक रेसिपी प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यात सर्वाधिक प्रकार हे झणझणीत पदार्थांचे आहेत यात वाद नाही. त्यात कोल्हापूर, कोकणी, खान्देशी आणि साताऱ्याचे पदार्थ तर नेहमीच अव्वल म्हणावे लागतील. त्यातील एक पदार्थ म्हणजे अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या. चला तर आज पाहूया अस्सल सातारी झणझणीत शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी;

संपूर्ण साहित्य:
* १/२ कप शेंगदाणे
* १ कांदा
* ७-८ लसूण पाकळ्या
* ४-५ कडीपत्ता पाने
* १ हिरवी मिरची
* १ टेबलस्पून तेल
* १ टीस्पून जीरे मोहरी
* १ टीस्पून कांदा लसूण मसाला
* १ टीस्पून तिखट
* १/२ टीस्पून हळद
* चिमूटभर हिंग
* १ टेबलस्पून कोथिंबीर
* १ कप पाणी

संपूर्ण कृती:
१. म्हाद्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतले.
२. शेंगदाणे भाजून घेतले, कांदा चिरून घेतला.लसूण मिरची वाटून घेतली.शेंगदाणे मिक्सरमधून भरड फिरवून घेतले.
३. तेल तापल्यावर त्यात जीरे मोहरी घातली,ती तडतडल्यावर कडीपत्ता,हिंग,लसूण मिरची घालून मग कांदा घालून परतले.
४. कांदा,लसूण मिरची छान परतल्यावर त्यात हळद,तिखट,कांदा लसूण मसाला घालून परतले.मग शेंगदाण्याची भरड,मीठ घालून नीट मिक्स केले.
५. त्यात पाणी घालून ढवळून झाकण ठेऊन ७-८ मिनीटे शिजवून घेतले.कोथिंबीर घातली.
६. गरम गरम भाकरीसोबत झणझणीत म्हाद्या,दही, कांदा असे सर्व्ह केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Shengdana Mahadya recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x