11 July 2020 2:17 PM
अँप डाउनलोड

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याच्या हालचाली?

बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, वाट्टेल ती किंमत मोजून त्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदारानेच हा दावा केला असून पक्षाचे तीन आमदार सध्या भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेसचे ते तीन आमदार सध्या मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत असे सांगितले. कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी के. शिवकुमार यांनी रविवार म्हटलं की, राज्यातील काँग्रेस- जेडीएस सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं ‘ऑपरेशन लोटस’ सुरु झालं आहे. तसेच काँग्रेसचे जे तीन आमदार मुंबईच्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तेथे त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक नेते सुद्धा विशेष काळजी घेत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री शिवकुमार यांनी म्हटलं की, ‘या आमदारांना तिथे किती रक्कम ऑफर करण्यात आली. ते सुद्धा आम्हाला माहित आहे.’ शिवकुमार यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी भाजप प्रति थंडी मवाळ असल्याचा सुद्धा आरोप केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आमचे मुख्यमंत्री भाजपच्या प्रति थोडे जास्तच मवाळ असल्याचे जाणवते आहे. परंतु, आम्ही जो प्रयत्न सुरु आहे त्याबाबत आमच्या सगळ्या आमदारांना तसेच सिद्धरमैया यांना माहिती दिल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x