14 May 2021 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
x

फिल्मी देशभक्त! अनेकांकडून छपाक'चं बुकिंग कॅन्सल...पण तिकीट सर्वांचं सारखंच

JNU, Deepika Padukone

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर जोरदार टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील नेत्यांकडून करण्यात आली. त्यासाठी दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन समाज माध्यमांवरून करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यामुळेच दीपिकाच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्विटरवरुन करण्यात येत आहे. अनेकांनी तर छपाकची तिकीटं आपण रद्द केल्याचं म्हणत तसे स्क्रिनशॉट्सदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत. अधिकाधिक लोकांनी छपाकवर बहिष्कार घालावा या उद्देशानं हे स्क्रिनशॉट्स शेअर केले जात आहेत. पण ही सगळी तिकिटं अगदी सारखीच असल्याचं लक्षात येत आहे. मात्र समाज माध्यमांवरील एकूण कॅम्पेनचं निरीक्षण केलं असता यांना देश भक्त म्हणावे की फिल्मी देशभक्त असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. जणू समाज माध्यमांवरील सर्व देशभक्त एकाच थिएटरमध्ये आणि केवळ ३ खुर्च्यांवर बसून छपाक चित्रपट पाहणार होते की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे आणि त्यामुळे ही देशभक्तीच्या नावाने केली गेलेली निव्वळ स्टंटबाजी असल्याचं म्हटलं जातं आहे.

१० जानेवारीला म्हणजे उद्या छपाक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावर अधिकाधिक जणांनी बहिष्कार टाकावा यासाठी ट्विटरवरुन आवाहन करणाऱ्या अनेकांनी आपण चित्रपटाची तिकीटं रद्द केल्याचं म्हटलं आहे. छपाक चित्रपटाची तिकीटं रद्द करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण गंमत म्हणजे या सगळ्यांनी सारखीच तिकीटं रद्द केली आहेत. वडोदऱ्यातील अकोटामध्ये असणाऱ्या सिनेमार्क चित्रपटगृहात १० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी दाखवल्या जाणाऱ्या छपाकची तिकीटं रद्द करण्यात आल्याचं अनेकांच्या ट्विटमधून दिसतं. या सगळ्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्सवर नीट नजर टाकल्यास त्यावर गोल्ड क्लासमधील A8, A9 आणि A10 या सीट्सचा उल्लेख दिसेल. तिकीटं रद्द केल्यामुळे या सगळ्या मंडळींना ४२० रुपये परत मिळाले आहेत. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकणारी सगळी मंडळी एकाच चित्रपटगृहात जाऊन फक्त ३ खुर्च्यांवर जाऊन बसणार होती की काय, असा गमतीशीर प्रश्न विचारला जात आहे.

 

Web Title:  Bollywood Actress Deepika Padukones JNU Visit many people cancelled ticket of chhapaak movie but ticket is same..

हॅशटॅग्स

#filmy(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x