13 July 2020 8:48 AM
अँप डाउनलोड

पवार कुटुंबियांना बारामतीत संपवता संपवता भाजप नागपूर-कोल्हापुरात संपला

Nagpur ZP, Devendra Fadnavis

नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्य़ात मंगळवारी सरासरी ६७ टक्के मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान बघता धक्कादायक निकाल अपेक्षित होता. सकाळपासूनच धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नागपुरात आरएसएस’च्या मुख्य कार्यालयासहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र काल धक्कादायक निकाल लागले. याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. परंतु, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.

नागपूरातील भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

तत्पूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून राष्ट्रवादी संपविण्याचं भाष्य केलं होतं. त्यानुसार पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला होता. वास्तविक भाजपकडे अजित पवारांच्या विरुद्ध उमेदवाराचं नसल्याने त्यांनी पडळकरांच्या नावाने केवळ हवानिर्मिती करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता.

याचबरोबर, गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग बारामतीत आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यावेळी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र आज कोल्हापुरातून चंद्रकांत पाटील यांच्यासहित भाजप राजकीय दृष्ट्या हद्दपार झाली आहे आणि नागपुरात फडणवीसांना साधी जिल्हा परिषद देखील भाजपकडे राखण्यात अपयश आल्याने भाजपचं वास्तव उघड झालं आहे असंच म्हणावं लागेल.

 

Web Title:  Fadnavis was declared to Finish Pawar family in Baramati but not BJP unable to win Nagpur ZP.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(453)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x