19 April 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार?
x

Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

State Municipal Corporation Elections 2022

मुंबई, २२ सप्टेंबर | महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. राज्यात पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय.

Municipal Corporation Elections 2022, राज्यातील सर्वच महापालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत – State Municipal Corporation Elections 2022 will be multi member ward structure decision by Mahavikas Aghadi Government :

पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: State Municipal Corporation Elections 2022 will be multi member ward structure decision by Mahavikas Aghadi Government.

हॅशटॅग्स

#BMCElection2022(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x