24 September 2020 10:18 PM
अँप डाउनलोड

विदर्भ बंदच्या हाकेला तुरळक प्रतिसाद, पोलिसांकडून ५० कार्यकर्त्यांना अटक

नागपूर : नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरल्याने विदर्भवादी संघटनांनी विदर्भ बंदी हाक दिली खरी, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आला असल्याने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ नंतर विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले खरे, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभल्याने हे आंदोलन फसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नागपूर पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी या विदर्भवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘विदर्भविरोधी आमदारांनो परत जा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. परंतु उपस्थित पोलिसांनी आंदोलनाचा या प्रयत्नं हाणून पाडला आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारवर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x