10 August 2020 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स राज्यात भाजपचं सरकार आल्यावर आपला उदय झाला, तत्पूर्वीचे आपले महान कार्य राज्यापुढे नाही भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली
x

काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार

पुणे : आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला असून येत्या आठवड्याभरात दोन्ही पक्षांमधील जागावाटप ठरणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीपी हे दोन्ही पक्ष त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करणार नसल्याचेही दोन्ही पक्षादरम्यान ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे असं सुद्धा पवार म्हणाले. परंतु भाजप व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु प्रकाश आंबेडकर जी भाजप विरोधात आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार नसून आमचे राज्य पातळीवरील नेते त्यात प्रतिनिधित्व करतील असं सुद्धा पवारांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं.

पुढे नाणार’बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, नाणार प्रकल्प व समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांबाबत महाराष्ट्र सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात घेतले नसून ते लोकशाहीला धरून नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x