26 September 2020 9:02 PM
अँप डाउनलोड

आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून १४ पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्यात आली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि नापिकी सारख्या अनेक प्रश्नांनी होरपळलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर विचार करून अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. धानाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये २०० रुपयांनी वाढ करून ती १८०० रुपये प्रति क्विंटल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी, म्हणजे मागील १० वर्षांपासून हा यात वाढ करण्यात आली नव्हती. २००८-०९ या आर्थिक वर्षात तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने १५५ रुपये इतकी वाढ केली होती.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर ३३, ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे समजते. सरकारकडून वाढविण्यात आलेल्या एमएसपीचे मूल्य जी.डी.पी’च्या ०.२ टक्के इतका आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x