16 July 2020 12:23 AM
अँप डाउनलोड

गुरु ग्रंथ साहिब अवमान; अक्षय कुमारची पंजाब एसआयटीकडून चौकशी

चंडीगड : शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब राज्य एसआयटीकडून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची आज तब्बल २ तास प्रश्नांचा भडीमार करत कसून चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब राज्य एसआयटीने अक्षय कुमारला चौकशीदरम्यान तब्बल ४२ प्रश्न विचारल्याची माहिती आहे. परंतु, अक्षय कुमारने पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा रामरहीम सिंग याचा ‘मेसेंजर ऑफ गॉड’ नावाचा एक सिनेमा सप्टेंबर २०१५ मध्ये चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सदर प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका सुद्धा करण्यात आली होती. परंतु, पंजाबमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रचंड झाला होता. दरम्यान, तोच विरोध डावलून सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय रामरहीम तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या भेटीत झाला होता.

विशेष म्हणजे ती बैठक बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारच्या घरी पार पडली होती असा थेट आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळेच या प्रकरणात अक्षयकुमार कात्रीत सापडला होता. याच प्रकरणामुळे धर्मग्रंथाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय कुमार, रामरहीम तसेच सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते.

त्यामुळे या प्रकरणात सुखबीर सिंग बादल आणि अभिनेता अक्षय कुमारला पंजाब एसआयटीने चौकशीसाठी बोलावले आले होते. त्यानुसार आज त्याने SIT समोर हजेरी लावली.चौकशी दरम्यान संबंधित चौकशी करण्याऱ्या अधिकाऱ्यांनी अक्षय कुमारला रामरहीमच्या भेटीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यात, रामरहीम सोबत नेमकी ओळख कशी आणि कुठे झाली? असे अनेक प्रश्न त्याला चौकशी अधिकाऱ्यांनी विचारून सुन्न करून टाकले. दरम्यान, सदर प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x