14 December 2024 3:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

सुशांतने फ्लॅट घेऊन दिल्याचा आरोप झाला | अंकिताने दिले पुरावे आणि....

Ankita Lokhande, Bank Statement, Sushant Singh Rajput, Marathi News, Breaking News

मुंबई, १५ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा साडेचार कोटींचा फ्लॅटचा ईएमआय अभिनेता स्वत: भरत असल्याचा एक नवीन खुलासा समोर आला आहे. पण, आता स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले असून पुरावे दाखवून सत्य दाखविले आहे. अंकिताने बँक स्टेटमेंट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की फ्लॅटची देयकेची ही बाब चुकीची आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या फ्लॅटचं रजिस्ट्री कागज पोस्ट करताना लिहलेय की, ‘माझ्यावर होत असलेल्या आरोपाचं मी खंडन करतेय. यापेक्षा आधिक ट्रांसपेरेंट होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रे आणि बँक डिटेल्स. यामध्ये तूम्ही पाहू शकता. एक जानेवारी २०१९ ते एक मार्च २०२० पर्यंत माझ्या खात्यातून पैसे कट झाले आहेत.’ अंकिताच्या या पोस्टवर सुशांत राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने कमेंट केली आहे. श्वेता सिंह म्हणते, ‘तू स्वतंत्र मुलगी असल्याचं मला माहित आहे. याचा गर्व आहे.’ अंकिता लोखंडेनं ही कागदपत्रे पोस्ट केल्यानंतर काही चात्यांनी तिच्या सपोर्टमध्ये मत व्यक्त केलं आहे. तू आत्मनिर्भर असल्याचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, असे एका चाहत्यानं ट्विट करत अंकिताला दिलासा दिला आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहतेय. रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट रिकामा करायचा होता. परंतु अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती.

 

View this post on Instagram

 

In continuation 🙏🏻

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 

 

News English Summary: Actor Ankita Lokhande has shared details of her flat registration and EMI deductions after reports emerged that the EMI for a flat where she stayed were deducted from late actor Sushant Singh Rajput’s account. Ankita has been solidly supporting the family of the late actor in demanding a Central Bureau of Investigation (CBI) probe into his death.

News English Title: Ankita Lokhande Shared Bank Statement After Being Accused Of Emi Filled With Flat From Sushant Singh Rajput News latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x