29 June 2022 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

खुर्ची गेल्याची तडफड होतेय, असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटतंय? - अनिल परब

Minister Anil Parab, Sushant Singh Rajput suicide case, Amruta Fadnavis, Aaditya Thackeray

मुंबई, ४ ऑगस्ट: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. आज अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आता राजकारण सुरू झालं आहे. या प्रकरणावर ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी मुंबई सुरक्षित नाही असं म्हणतं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. असं असताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‘खुर्ची गेल्याची तडफड होतेय. असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय’ असं म्हणत हातातून सत्ता गेल्यावर आता मुंबई असुरक्षित वाटत असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे. गेली ५ वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते. पोलिसांवर विश्वास नसेल, सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी राज्य सोडून जावे. हे केवळ राजकारण करण्यासाठी होत असल्याचं अनिल परब म्हणाले.

 

News English Summary: Amrita Fadnavis says Mumbai is not safe, has cast doubt on the Mumbai police investigation. Meanwhile, now Transport Minister Anil Parab has criticized the late Fadnavis.

News English Title: Minister Anil Parab on Sushant Singh Rajput suicide case Amruta Fadnavis and Aaditya Thackeray News latest Updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x