23 September 2019 11:08 AM
अँप डाउनलोड

जयघोषाने रायगड दुमदुमला! किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

Chatrapati Shivaji Maharaj

रायगड : स्वराज्याची राजधानी रायगडात किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने रायगडावर हजेरी लावली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पहाटेच रायगडावर हजेरी लावून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. ते रोप वेने याठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे यंदा शेतकरी बांधवांना अभिषेकचा मान देण्यात आला आहे.

महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने ५ जूनच्या सायंकाळपासूनच गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा, शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम होणार आहेत. शिवभक्तांकडून महाराजांच्या जयघोषाने पूर्ण रायगड दुमदुमला आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने गड आणि गडपरिसरात गतवर्षीपेक्षा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुमारे ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे एक हजार स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Maharashtra(26)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या