20 April 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केंद्र, राज्य व पालिका हातात तरी 'मराठी भाषा भवन' बनता बनेना; पण हिंदी भाषा शाळांच्या भव्य इमारती

BMC, Shivsena, Marathi Bhasha Bhawan, Marathi language, Uddhav Thackeray, Aditya Thackeray

मुंबई : राज्यात मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. बाकी इतरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत येऊन देखील गप्प का बसली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मात्र शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा आणि मराठी माणसाचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मराठी भाषा भवन निश्चित करण्यात आलेली रंगभवन वास्तू हेरिटेज असल्याने या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत २०१८ मध्येच स्पष्ट करण्यात आले होते. मराठी भाषा भवनासाठी रंगभवनाऐवजी मुंबईबाहेर जागा शोधण्याचा प्रस्ताव आला असता शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. मराठी भाषा भवन हे मुंबईतच आणि मंत्रालयाच्या जवळपासच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली. यावर मराठी भाषा भवन मुंबईतच करण्यासाठीच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन समिती नियुक्त करण्यात आली होती.

यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात रंगभवन येथे मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राची (मराठी भाषा भवन) उभारणी करण्यात येणार होती. मात्र रंगभवनची वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट असल्याने या जागेकर भाषा भवन उभारण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे असे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट करण्यात आल्यानंतर शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मराठी भाषा भवन मुंबईतच झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी त्यांना साथ दिली होती.

शिवसेनेने केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारतर्फे मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाला आता गती देण्यात आली होती आणि दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाच्या भागात या भवनाच्या प्रशासकीय कार्यालयांची उभारणी करण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या मंत्री स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले होते. त्याचप्रमाणे यासाठी एक महिन्याच्या आत समिती नेमून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

मुंबई महानगर पालिकेवर १९९७ पासून शिवसेना सतत २१ वर्ष सत्तेत आहे. परंतु मुंबईमधला केवळ मराठी संस्कृतिकच नव्हे तर मराठी भाषेचा टक्का शिक्षण व्यवस्थेत देखील खालावत असून हिंदी भाषेच्या शाळांसाठी लागणाऱ्या बहुमजली इमारतींसाठी मोठा निधी मुंबई महापालिकेकडून येतो कुठून हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. याच मुंबईमध्ये हिंदी भाषिकांसाठी हिंदी भाषेच्या शाळांचे अनेक माजली इमारती शिवसेना प्रणित महापालिका उभ्या करत आहेत आणि थाटात निमंत्रण पत्रिका वाटून उदघाटन सुद्धा केली जात आहेत.

उदाहरणच दयायचे झाल्यास मुंबईतील कुर्ला पश्चिमला काजूपाडा येथे आज ३ मजली मनपा हिंदी शाळेच भूमिपूजन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडले होते आणि स्थानिक शिवसेना नागरसेवकांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र हेच हिंदीसाठी जीव ओतून केलेले प्रयत्न शिवसेनेचे नेतेमंडळी मराठीसाठी करताना दिसत नाहीत.

मुंबई महापालिकेचा आरोग्य आणि शैक्षणिक निधी हा देखील मराठी माणसाच्या किती कामाचा आणि अमराठी लोकांच्या किती फायद्याचा अशीच म्हणायची वेळ आली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मराठी बद्दलची अनास्था आणि हिंदी बद्दलची जवळीक महाराष्ट्र, मुंबई आणि मराठीला एका भयानक भविष्याकडे ओढून घेऊन जात आहे हे वास्तव डोळ्यासमोर आहे. मुंबई शहरातील सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक निधी जर हिंदीवरच खर्ची जाणार असेल आणि सर्व सोयीसुद्धा हिंदी भाषिकांनाच प्राप्त होणार असतील तर हे लोंढे वाढतच राहणार यात शंका नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x