13 December 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सतत मोदी भक्ती आणि इतरांना देशद्रोही जाहीर करणं नडलं? फ्लॉप चित्रपटांची मालिका, जाहिराती मिळेना, कंगना भाजप प्रवेशाच्या तयारीत

Actress Kangana Ranaut

Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत जितकी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, तितकीच ती आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे ही चर्चेत असते. समाज माध्यमांवर तिला नौटंकी क्वीन म्हणून देखील संबोधलं जातं. मागील काही वर्षात तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तसेच तिला जाहिराती देखील मिळत नसल्याने ती भलत्याच आर्थिक कचाट्यात अडकल्याची चर्चा आहे.

त्यामुळे आता तिने राजकारणातील प्रवेशाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीकृष्ण प्रसन्न असतील तर ती नक्कीच आगामी निवडणूक लढवेन, असे कंगना रणौतने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे भाजप तिला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ शकते, अशी अटकळ जोर धरू लागली आहे. मात्र तिच्या मुळे मतदार भाजपवर अजून नाराज होण्याचा देखील अंदाज आहे.

दसऱ्याला रावण दहन आणि कंगनाची फजिती
पूर्वी पब लाईफ आणि पेज-थ्री आयुष्य अनुभवणारी कंगना सध्या प्रचंड देव-देव करत असल्याचं पाहायला मिळतंय. कंगना रणौतने श्रीकृष्णाची नगरी द्वारका येथील मंदिरांना भेट दिली. ती साडी नेसून भेटायला आली होती. तत्पूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहनासाठी कंगना रणौत आली होती.

सहसा पंतप्रधान येथे रावण दहन करीत असत. यावेळी कंगनाचे येणे हे देखील ती राजकीय एन्ट्री करण्याची चिन्हे होती. वास्तविक तिथे देखील तिची फजिती झाली होती. कारण रावण आधीच कोसळला होता तर कंगनाचा बाण बाजूला उभ्या असलेल्या आयोजकांच्या पायावर पडला होता.

राम मंदिरावरही कंगना बोलली
600 वर्षांच्या संघर्षानंतर आज राम मंदिर तयार होत आहे, असं कंगना राणावत म्हणाली. भाजपमुळे देशाने हा दिवस पाहिला आहे. आम्ही मोठ्या थाटामाटात मंदिराची पुनर्स्थापना करत आहोत. हा जणू सनातन धर्माचा मोठा उत्सव आहे. नुकताच कंगना रणौतचा तेजस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसादच मिळाला नाही आणि भाजप नेत्यांनी मार्केटिंग करूनही प्रेक्षक सिनेमा गृहांकडे फिरकले नाही आणि सिनेमा सुपर फ्लॉप झाला. दरम्यान, कंगना रणौत द्वारका येथे पोहोचली. “मन खूप अस्वस्थ होतं. अशा वेळी मला द्वारकाधीशला भेट द्यायची होती. श्रीकृष्णाच्या नगरीत येताच सर्व चिंता मोडीत निघाल्या आणि पावलावर पडल्या. माझं मन स्थिर झालं. आनंदाची अनुभूती येते असे फिल्मी डायलॉग्स तिने मारले.

News Title : Bollywood actress Kangana Ranaut may contest Lok Sabha Election 2024 03 November 2023.

हॅशटॅग्स

#Actress Kangana Ranaut(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x