6 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATASTEEL Horoscope Today | सूर्य-चंद्राचा व्यतिपात योग; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल तर, काहींचे प्रेमसंबंध बहरतील, यामध्ये तुमची रास आहे का पहा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर 200 रुपयांची पातळी गाठणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Big Breaking

FM Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेंगळुरूयेथील विशेष लोकअदालतीने या तक्रारीवर सुनावणी करताना अर्थमंत्री आणि इतर अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनाधिकार संघर्ष परिषदेचे सहअध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरूयेथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात केली होती. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून धमकावून खंडणी केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस स्टेशनला इलेक्टोरल बॉण्डद्वारे खंडणी प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. एसीएमएम कोर्टाने तक्रारीची प्रत आणि रेकॉर्डची प्रत पोलिस ठाण्यात पाठविण्याचे आदेश दिले. एफआयआर प्रलंबित असल्याने सुनावणी १० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

न्यायालयाने टिळकनगर पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जे पी नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ईडी विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या कंपनीकडून सुमारे २३० कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून ४९ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून गोळा करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Latest Marathi News | Big Breaking Bengaluru Special Court Orders FIR Against Union Finance Minster Nirmala Sitharaman 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x