
Gold Loan | सुवर्णकर्ज हे एक असं कर्ज आहे की, जे सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गातील व्यक्तींना सोपं पडू शकत. सोनं कमावून आपण आपली संपत्ती वाढवत असतो. त्याचबरोबर अनेकांना सुवर्ण कर्ज घेणे फायद्याचे आणि कमी किचकटीचे काम वाटते. समजा तुम्हाला ऐनवेळेला आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज हवे असेल आणि तुमच्याकडे कर्जासाठी बँक आणि वित्तीय संस्था सोडून दुसरे कोणतेही पर्याय उरले नसतील तर, तुम्ही सुवर्ण कर्ज घेण्याचा पर्याय निवडू शकता. परंतु सुवर्ण कर्ज घेताना काही गोष्टींची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
1) तुम्ही कुठून लोन घेत आहात हे महत्त्वाचे आहे :
गोल्ड लोन घेताना या गोष्टीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणाहून घेत आहात. तसं पाहायला गेलं तर बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स म्हणजेच NBFC या दोन्ही ठिकाणाहून तुम्ही लोन प्राप्त करू शकता. परंतु बँकेचे व्याजदर एनबीएफसी पेक्षा कमी असते. तुम्हाला कमी व्याजदर लागू करून घ्यायचं असेल तर, बँक आणि नॉन बँकिंगमधील व्याजदराची माहिती करून घ्या. जर तुम्ही व्यवस्थित पडताळणी केली नाही तर तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागू शकते.
2) तुम्ही कोणत्या कामांसाठी गोल्ड लोन घेत आहात हे देखील महत्त्वाचे आहे :
गोल्ड लोन घेताना तुम्ही कोणत्या कामासाठी गोल्ड लोन घेत आहात ही गोष्ट देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्ती गंभीर आजार झाला असेल तर तुम्ही गोल्ड लोनचा पर्याय निवडू शकता. त्याचबरोबर लग्नकार्य पार पाडण्यासाठी देखील तुम्ही गोल्ड लोन घेऊन नंतर कर्ज फेडून स्वतःचं सोन परत मिळवू शकता.
3) लोन घेण्याआधी या गोष्टीचा देखील विचार करा :
समजा तुम्ही सुवर्णकर्ज घेतलंय आणि घेतलेलं लोन फेडण्याची मुदत निघून गेली असेल तर, कर्जदाता म्हणजेच ज्या व्यक्तीने तुम्हाला कर्ज दिलं आहे तो व्यक्ती तुमचं सोन विकू देखील शकतो. तुमचं सोनं विकून टाकण्याचे अधिकार त्याला असतात. तसं पाहायला गेलं तर बँका तीन वर्ष किंवा तीन महिन्यांसाठी गोल्ड लोन देतात. परंतु एनबीएफसीमध्ये गोल्ड लोनचं टेनॉर वेगळं असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला लोन घेण्याची आणि परतफेड करण्याची मुदत निश्चित करावी लागेल. नाहीतर तुमचं सोनं गेलंच म्हणून समजा.
4) गोल्ड लोन घेण्याचे हे फायदे देखील माहित असायला हवे :
तुम्ही गोल्ड लोन घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. गोल्ड लोन इतर लोनपेक्षा परवडणारे लोन असते. प्रॉपर्टी लोन, पर्सनल लोन, कॉर्पोरेट लोन या सर्व लोनपेक्षा गोल्ड लोनचा क्राइटेरिया साधा सोपा असतो. त्याचबरोबर गोल्ड लोनमध्ये क्रेडिट स्कोर कमी जास्त असणे या सर्व गोष्टींना जास्त महत्त्व नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी गोल्ड लोनचा ऑप्शन सोपा राहू शकतो.