9 October 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी 2 विजेता शिव ठाकरेची एन्ट्री, नव्या ट्विस्टकडे सर्वांचं लक्ष - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • शिव ठाकरेने घरात येताच केलं हे काम :
  • कोण आहे शिव ठाकरे :
  • 6 ऑक्टोंबरला रितेश देशमुख यांची उपस्थिती :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वातील शेवटच्या आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. येत्या 6 ऑक्टोंबरला बिग बॉस मराठी पाचव्या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान बिबींच्या घरातील सर्वात गाजलेली सदस्या निक्की तांबोळी हिने तिकीट टू फिनाले मिळवत अनेकांच्या जीवाला घोर लावलं आहे. एकीकडे निक्कीच मोठ्या प्रमाणात कौतुक देखील होताना पाहायला मिळतय.

सध्या बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो सोशल मीडियावर वायरल होत आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस सीजन 2’ चा विजेता ‘शिव ठाकरे’ याची घरामध्ये एन्ट्री होणार आहे. त्याच्या येण्याने बिग बॉस उर्वरित सदस्यांसमोर कोण कोणते टास्क आणून ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

शिव ठाकरेने घरात येताच केलं हे काम :

शिव ठाकरे याने बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेताच सर्व सदस्यांना वाकून मुजरा केला आहे. त्यानंतर शिव ठाकरेच्या येण्याने बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदा ग्रँड फिनाले सेलिब्रेशन रंगणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शिव ठाकरे म्हणाला की,”तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट”. असं म्हणून झाल्यानंतर शिवने घरातील सर्व सदस्यांची भेट घेतली. आजच्या भागात आपल्याला शिवच्या एन्ट्रीने घरामध्ये कोणते पडसाद उमटणार त्याचबरोबर बिग बॉस सर्व नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांसाठी कोणता नवीन टास्क समोर आणून ठेवणार याकडे घरातील सदस्यांच आणि प्रेक्षकांचा देखील लक्ष लागलेलं आहे.

कोण आहे शिव ठाकरे :

शिव ठाकरेचा मोठा चहाचावर्ग असून तो केवळ बिग बॉस 2 चा विजेताच नाही तर, बिग बॉसच्या हिंदी 16 व्या सीझनचा फर्स्ट रनर अप देखील आहे. शिवची इंस्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर चांगलीच फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. बिग बॉसचे यंदाचे परवा सुपर डुपर हिट ठरले आहे. अनेकांनी बिग बॉस या शोला डोक्यावर धरलं आहे.

दरम्यान कालच्या भागात बिग बॉसच्या घरात निक्कीवरून अभिजीत आणि अंकितामध्ये प्रचंड वाद झाल्याचा पाहायला मिळाला. अगदी पहिल्या दिवसापासूनच निकी घरातील कोणत्याही कामाला हात लावायला अजिबात मागत नाही. तिने यावेळेस देखील मी फक्त डायनिंग टेबल साफ करणार असं सांगून इतर कोणत्याही कामाला हात लावलेला नाही. त्यामुळे तिच्या कामावरून बिग बॉस तिला पुन्हा शिक्षा ठोठावणारे की नाही याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

6 ऑक्टोंबरला रितेश देशमुख यांची उपस्थिती :

गेल्या दोन आठवड्यांपासून रितेशने भाऊच्या धक्क्यावर अनुपस्थिती दाखवली. तो परदेशात आपल्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करताना पाहायला मिळाला. परंतु 6 ऑक्टोबरला ग्रँड फिनालेच्या दिवशी रितेश देशमुख त्याची उपस्थिती दर्शवणार आहे. त्यामुळे शेवटी का होईना रितेश घरातील सदस्यांची पुन्हा एकदा शाळा घेणार की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi season 5 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x