9 October 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News
x

SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संयम देईल मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • SJVN Share PriceNSE: SJVN – एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश
  • महाराष्ट्र सरकार सोबत करारा
  • कंपनीमध्ये LIC ची गुंतवणूक
SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)

या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला महाराष्ट्रात पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि फ्लोटिंग सोलर पावर प्लांट उभारायचे आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 131.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महाराष्ट्र सरकार सोबत करारा
मागील आठवड्यात एसजेव्हीएन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने सामंजस्य करार केला होता. या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 5 पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण ऊर्जा निर्मिती क्षमता 8100 मेगावॅट असेल. दुसऱ्या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 505 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारायचा आहे. या दोन प्रकल्पांचे एकूण मूल्य 48,000 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8400 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.

कंपनीमध्ये LIC ची गुंतवणूक
मागील एका वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 10 टक्के वाढली आहे. एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 63.38 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52,502.06 कोटी रुपये आहे. भारत सरकारने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे 80 टक्केपेक्षा जास्त भागभांडवल धारण केले आहे. या कंपनीमध्ये एलआयसीने देखील मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x