21 January 2025 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

EPFO Passbook | नोकरदारांनो, तुमचा महिना पगार 20,000 रुपये असेल तरी EPF चे 1.50 करोड रुपये मिळणार, फायदाच फायदा

EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी तसेच महागाई भत्ते मिळून पगारातील 12% योगदान ईपीएफ खात्यामध्ये द्यावे लागते. या खात्यामध्ये एम्प्लॉवर देखील योगदान करतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात दीर्घकाळापर्यंत चांगली रक्कम जमा होण्यास मदत होते.

कर्मचाऱ्यांकरिता ईपीएफ फंड ही एक रिटायरमेंट स्कीमच आहे. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याला मॅनेज करण्याचे काम ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन यांचे असते. या संस्थेमार्फतच कर्मचाऱ्यांना पीएफ प्राप्ती होते. जेणेकरून रिटायरमेंटचे आयुष्य जगताना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये दोन भागांचे योगदान होते त्यामुळे एकूण 24% योगदान खात्यामध्ये होत असते. पीपीएफ खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर सरकार व्याजदर निश्चित करत असते. सध्याच्या घडीला वार्षिक व्याजदर 8.25% आहे.

गरज नसेल तर पैसे विथड्रॉ करू नका :
ईपीएफ योजनेअंतर्गत तुम्ही निवृत्ती पर्यंत लाखो करोडोंचा फंड तयार करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचे सातत्य ठेवून मध्ये कधीतरी पैसे विथड्रॉ करायचे नाही आहेत. बऱ्याचदा व्यक्ती जास्त गरज नसली तरी सुद्धा सामान्य गरजांसाठी पैसे विथड्रॉ करतात. या कारणामुळे दीर्घकाळात जास्तीचा फंड जमा होण्यास मदत होत नाही.

ईपीएफओ नियम :
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 12-12 म्हणजेच एकूण 24% योगदान जात असते. यामधील कंपनीच्या योगदानामध्ये 8.33% पेन्शन फंड म्हणजेच ईपीएफमध्ये जमा केले जाते. तर, 3.67% ईपीएफ खात्यात जमा करण्यात येते.

अशा पद्धतीने जोडले जाते व्याज :
कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी + डीए मिळून 20,000 असेल तर, ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्यांचे योगदान 12% – 2,400 रुपये असेल. त्याचबरोबर कंपन्यांकडून ईपीएफ 3.67%-730 रुपये आणि ईपीएस 8.33%-1666 रुपये म्हणजेच 2400 + 730 = 3130 रुपये एवढं योगदान तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये जमा केले जाते. 8.25% टक्के वार्षिक व्याजदरानुसार प्रत्येक महिन्याला 0.6875 एवढे व्याज तुम्हाला मिळेल.

20,000 बेसिक सॅलरीचे ईपीएफ कॅल्क्युलेटर :
1) कर्मचाऱ्याचे वय : 25 वर्ष
2) रिटायरमेंटचे वय : 60 वर्ष
3) बेसिक सॅलरी + डीए : 20,000 रुपये
4) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%
5) कर्मचाऱ्याकडून खात्यामध्ये योगदान : 12%
6) कंपनीकडून खात्यामध्ये योगदान : 3.67%
7) वार्षिक व्याजदर : 8.25%
8) एकूण योगदान : 36,04,312
9) निवृत्तीनंतर मिळणारा फंड : 1,44,83,861
10) एकूण व्याजाचा झालेला फायदा : 1,08,78,508

Latest Marathi News | EPFO Passbook 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x