15 December 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Amul Price Hike | अमूलची दही-लस्सी महागली, दुधाचे दरही लवकरच वाढणार, मोदी सरकारच्या जीएसटीचा परिणाम

Amul Price Hike

Amul Price Hike | जीएसटी कौन्सिलने पॅकबंद अन्नपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्यानंतर मंगळवारपासून अमूलचे दही आणि लस्सी, ताक महाग झाले आहे. लवकरच दुधाच्या दरातही वाढ होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर किंमतीत आजपासून तेजी :
18 एप्रिलपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांच्या किंमतीतही आजपासून तेजी पाहायला मिळत आहे. दिल्ली-यूपीबद्दल बोलायचे झाले तर २०० ग्रॅम दही आता १६ रुपयांऐवजी १७ रुपयांना मिळणार आहे, तर ४०० ग्रॅम दह्याचे पॅकेट आता ३० रुपयांऐवजी ३२ रुपये मोजावे लागणार आहेत. अशातच आता 1 किलोचे दही पॅकेट 65 रुपयांऐवजी 69 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय व्हे पाऊच आता १० रुपयांऐवजी ११ रुपयांना मिळणार आहेत, अमूल फ्लेवर्ड मिल्कची बाटलीही आता २० रुपयांऐवजी २२ रुपयांना विकली जात आहे. त्याचप्रमाणे व्हे टेट्रा पॅक असलेले २०० मिलीचे पॅकेट १२ रुपयांऐवजी १३ रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत अमूलची उत्पादने आणखी महागली :
अमूलने आता मुंबईत आपला 200 ग्रॅम दही कप 21 रुपयांना बदलला आहे, जो पूर्वी 20 रुपये होता. त्याचप्रमाणे एक कप ४०० ग्रॅम दही आता ४२ रुपयांना मिळणार असून, पूर्वी ते ४० रुपयांना मिळत होते. पाउचमध्ये मिळणारे ४०० ग्रॅम दही आता ३२ रुपयांना मिळते, जे पूर्वी ३० रुपयांना मिळत होते. १ किलोचे पॅकेटही आता ६५ रुपयांऐवजी ६९ रुपयांना मिळणार आहे.

जीएसटी वाढल्यामुळे किमती वाढवल्या :
मुंबईत आता ५०० ग्रॅम ताकाचे पॅकेट १५ ऐवजी १६ रुपयांना मिळणार आहे, तर १७० मिली लस्सीही १ रुपयाने महाग झाली आहे. मात्र, २०० ग्रॅम लस्सी १५ रुपयांतच मिळत राहणार आहे. ‘अमूल’चे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी सांगितले की, छोट्या पाकिटांवरील वाढीव किंमती आम्ही स्वतः सहन करू, मात्र काही उत्पादनांवरील जीएसटी वाढल्यामुळे किमती वाढवाव्या लागत आहेत.

इतर कंपन्याही लवकरच किंमती वाढवणार :
जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वप्रथम अमूलने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या किमती वाढतील, असा अंदाज आता बाजारातील जाणकार बांधू लागले आहेत. अमूलशिवाय आनंदा, पराग, कैलाश, मदर डेअरी, गोपाळ आणि मधुसूदन या कंपन्याही दही, मठ्ठा, दूध, पनीर, तूप इत्यादींचा पुरवठा करतात. या कंपन्यांचे दही, ताक, लस्सी लवकरच महागणार असल्याचे मानले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amul Price Hike after 5 percent GST from central government check details 19 July 2022.

हॅशटॅग्स

#Amul Price Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x