13 August 2022 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा
x

ITR DATE | आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत पुन्हा वाढवली | ‘ही’ असेल शेवटची तारीख

Income Tax Return Filing

मुंबई, ०९ सप्टेंबर | आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर करण्यात आली होती. त्या आधी करदात्यांनी आपला आयकर भरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आधी असलेली 31 जुलै ही मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर केली होती. करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे .आता शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे,अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात हे स्पष्ट केले आहे.

ITR DATE, आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत पुन्हा वाढवली, ‘ही’ असेल शेवटची तारीख – Income Tax Return Filing Deadline For FY21 Extended Again :

आर्थिक वर्ष 2020-2021 यासाठी आयकर भरायची मुदत ही या महिन्याच्या 30 सप्टेंबरपर्यंत होती . मात्र आता करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. जर आपले वार्षिक उत्पन्न हे पाच लाखांच्या आत आहे आणि आपण अंतिम मुदत पाळली नाही तर आपल्याला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

आयकर विभागाने आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरु केलं असून करदात्यांनी www.incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपले आयटीआर भरावा. नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश करदात्यांना सुलभ आणि गतिमान सुविधा पुरवणे हा आहे.

आधार-पॅन लिंक करण्याची मुदत:
केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली असून तीही 30 सप्टेंबर करण्यात आली . त्या आधी सर्वांनी आपले आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

एखाद्या व्यक्तीने 30 सप्टेंबरपर्यंत आपला पॅन कार्ड हे आधारशी जोडलं नाही तर त्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

दरम्यान, नवीन आयटी पोर्टल लाँच झाल्यापासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैठकीत अर्थमंत्र्यांनी यावर भर दिला की इन्फोसिसच्या वतीने अधिक संसाधने आणि प्रयत्न करण्याची गरज आहे जेणेकरून सहमत सेवांच्या विलंबाने वितरण सुनिश्चित होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Income Tax Return Filing Deadline For FY21 Extended Again.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x