JEE आणि NEET परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी
मुंबई, ३१ ऑगस्ट : कोरोना व्हायरसचं संकट आणखी गडद होत असतानाच JEE आणि NEET परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
रेल्वेच्या निर्णयानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं ऍडमिटकार्ड पाहून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ दिलं जाईल. गर्दी टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देताना अॅडमिट कार्ड तपासलं जाणार आहे. अॅडमिट कार्ड तपासल्यानंतरच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांना परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. यासंबंधी रेल्वे स्थानकं आणि तिथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त काऊंटर सुरु केले जाणार आहेत.
परिपत्रकात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विद्यार्थी वगळता इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान करोनाशी संबंधित सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.
News English Summary: JEE and NEET exam dates were announced just as the corona virus crisis was getting darker. So while there is some tension among the students, there is good news. Students appearing for this exam are allowed to travel on Mumbai Local.
News English Title: JEE NEET Candidates Are Permitted To Travel In Special Suburban Services News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट