12 December 2024 7:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

औरंगाबाद शिवसेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सेनेला जय महाराष्ट्र | मनसेत जाहीर प्रवेश

ShivSena workers, Aurangabad, Joined MNS

पुणे, ३१ ऑगस्ट : कोरोनाच्या ब्रेकनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज यांनी औरंगाबादेत शिवसेना दे-धक्का दिला आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

औरंगाबादेतील शिवसेना आणि पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेत प्रवेश केला. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे माजी खासदार आणि गटनेते चंद्रकांत खैरे यांना धक्का दिला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कबंर कसली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सिडको हडको भागात प्राबल्य असणारे राजू खरे, भाजपाचे माजी नगरसेवक नामदेव बेंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख व पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पै.प्रविण कडपें, जिल्हा संघटक अंकुश क्षीरसागर, कार्याध्यक्ष राजू परळीकर व शिवसेनेचे प्रशांत जोशी,रमेश मोदाणी, अरविंद जाधव यांच्यासह अनेकांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे, अशी माहिती औरंगबादचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिली.

दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गेल्या तीन महिन्यांआधीच राज्यातील महापालिकेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरनाचा प्रादुर्भाव कमी होताच महापालिकेच्या निवडणूका घेतल्या जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

News English Summary: Raj Thackeray has started meeting party activists. What is special is that Raj Thackeray has given a push to Shiv Sena in Aurangabad. In Aurangabad Shiv Sena, seven big Shiv Sainiks who have held the posts of Deputy City Chief, District Organizer have joined MNS.

News English Title: Shiv Sena workers from Aurangabad have joined MNS today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x