26 April 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

२३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला

Sharad Pawar, Devendra Modi

सोलापूर : पराभव समोर दिसत असल्यामुळेच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे मात्र विसरू नका. कारण, येथे २३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते. “माढा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी पवार साहेब आले होते. पण ते गेले मी खेळणार नाही बारावा गडी म्हणून मॅच पाहणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्याला आम्ही बारावा खेळाडू म्हणूनही खेळण्यास तयार नव्हतो. त्याला मैदानात उतरवले. आता असली कोण? आणि नकली टीम कोण? हे येत्या २३ तारखेला समजेल. नकली टीमच्या भरोशावर मॅच जिंकू शकत नाही.”

ही निवडणूक विकासाची व राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे मजबूत देश आहे, हे सांगण्याची निवडणूक आहे असे सांगत पुलवामा हल्ल्याचा पुरावा मागणाऱ्या काँग्रेस सरकारवर त्यांनी खबरी टीका केली. भारत हा पाकिस्तानशी चर्चा करणार नाही तर नादी लागणाऱ्यांना ठोकणारा देश आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x