ईशान्य मुंबईसह राज ठाकरेंच्या मुंबईत २ सभा
मुंबई : ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्या महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाविरोधात सभांचा धडका लावला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल करत आहेत. सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंची तोफ आता मुंबईत देखील धडाडणार आहे. २३ एप्रिल रोजी शिवडी येथे आणि २४ एप्रिल रोजी भांडूप येथे राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्याशिवाय २५ एप्रिल रोजी पनवेल येथे आणि २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावत राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात प्रचार सुरू केला आहे. राज ठाकरें यांच्या सभांचा समाज माध्यमांवर चांगलाच बोलबाला सुरू आहे. ईशान्य मुंबईतून शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने उमेदवार घोषित केला नव्हता. शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादात अखेर भाजप नगरसेवक मनोज कोटक यांची लॉटरी लागली. मात्र असं असलं तरी ईशान्य मुंबईतील भाजपमधील अंतर्गत विरोधक, शिवसेनेच्या राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा आणि त्यात बऱ्याच भागात मनसेचं प्राबल्य असल्याने मनोज कोटक यांची डोकं दुखी वाढली आहे. त्यात राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांच्या सारखा कार्यकर्त्यांची फौज असलेला आणि जवळपास सर्वच थरातून पाठिंबा असलेला उमेदवार दिल्याने भाजपचा केवळ गुजराती मतदार भरोसे मार्ग अत्यंत कठीण आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार असून त्याचा फायदा थेट संजय दीना पाटील यांना होऊ शकतो.
२४ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे मुंबईतील काळाचौकी अभ्युदयनगर येथे आयोजन केले होते. तेथे मात्र मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारात निवडणूक आयोगानं मनसेला स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यास सांगत चेंडू पालिकेकडे टोलवला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News