मुंबई : देशभरात आणि विशेष करून महाराष्ट्रात एखादा आर्थिक गैरव्यवहारासंबंधित एखादा विषय रंगला की भाजप खासदार किरीट सोमैया हे कागदी पुरावे घेऊन सर्व प्रसार माध्यमांवर झळकताना दिसायचे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना मी धडा शिकवणार अशी गर्जनाच ते प्रसार माध्यमांवर कारणात दिसायचे. परंतु देशभरात नीरव मोदी, भूपेश जैन, मेहुल चोक्सी ते विजय माल्या यांनी घोटाळ्यांचे विक्रम मोडीत काढले त्यानंतर हेच किरीट सोमैय्या कुठे ही दिसले नाही.
भाजपचे ते मुंबईतील राष्ट्रीय नेते होते म्हणून मिरवणारे किरीट सोमैय्या हे संपूर्ण मुंबईमध्ये एखादी घटना की, लगेचच संबंधित ठिकाणी हजर दिसायचे उदाहरणार्थ रेल्वे फलाट व गाडीचे पायदान यांच्यामधील अंतर स्वतः फलाटावर झोपून मोजणे आणि धोक्याचे मोजमाप काढणे. तर कधी सिग्नलच्या खांबावर चढून रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील ढिसाळपणा दाखविणे.
विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या विरोधात एल्गारच पुकारले होते. उदाहरण द्यायचेच झाले तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या पाठीशी कायदेशीर चौकशांचा ससेमिरा लावणे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे कागदोपत्री पुरावे देऊन प्रसारमाध्यमांना माहिती देणे. त्यानंतर मुंबईत राहून सुद्धा पुण्यातील डी एस कुलकर्णीच्या अटकेसाठी देव पाण्यात घालून बसणारे किरीट सोमैय्या नीरव मोदी, भूपेश जैन, मेहुल चोक्सी ते विजय माल्या यांच्या पाठी कधी पडल्याचे दिसलेच नाही.
किंबहुना नीरव मोदी, भूपेश जैन, मेहुल चोक्सी ते विजय माल्या यांचे विषय देशभरात गाजत असताना किरीट सोमैय्या यांना काही माहितीच नसावी असं एकूण चित्र होत. किव्हा हे घोटाळे भाजप सरकारच्या राजवटीत बाहेर आले असल्याने आणि त्यातील अनेक जण देशाबाहेर कसे पळाले याचे पुरावे त्याच्याकडे नसावेत म्हणून कदाचित सामान्य जनतेमध्ये ही किरीट सोमैय्याबद्दल चर्चा रंगली असावी.
एकूणच आर्थिक गुन्हें झाले म्हटलं की सामान्य लोकांना पहिलं नाव समोर यायचं ते किरीट सोमैय्या यांचं, कारण त्यात त्यांचा पुरावे सादर करण्याचा इतिहास हा सर्वज्ञात आहे. त्यामुळे देशभरात इकडे मोठे बँक क्षेत्रातील घोटाळे घडत असताना किरीट सोमैय्या यांची आठवण येणे साहजिकच आहे. काल ते अचानक मुलुंड येथे असल्याचे स्थानिक जनतेला समजले आहे. त्यामुळे ‘आता कुठे गेले किरीट सोमय्या’ या प्रश्नाचं उत्तर स्थानिक लोकांना मिळाल आहे. कालच त्यांनी एका फेरीवाल्याच्या नोटा फाडून फेकून दिल्याचे समजले आहे. त्यामुळे लवकरच लोकसभा निवडणूका जवळ आल्याचे मुलुंडमधील जनतेला समजले आहे.
