22 September 2023 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर?
x

VIDEO | GDP'ची ऐतिहासिक घसरण | राहुल गांधींचा इशारा सत्य ठरला

worst fall of GDP, Indias history, Rahul Gandhi

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट : पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत मी अगोदरच इशारा दिला होता. परंतु, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.

भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे. जीडीपीमध्ये १८ टक्क्यांची घट होईल असा अंदाज ब्लुमबर्गने ३१ अर्थतज्ज्ञांचा हवाला देत व्यक्त केला होता. मात्र करोनामुळे पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेची एवढी मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील ही चौथी मंदी असून यापूर्वी १९८० च्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये घट झाली होती. तिमाही पद्धतीने जीडीपीची माहिती गोळा करण्यास १९९७-९८ मध्ये सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे.

 

News English Summary: Once the world’s fastest-growing major economy, India is set to post the steepest quarterly decline in gross domestic product in Asia as it quickly becomes the global hotspot for coronavirus infections.

News English Title: The worst fall of GDP in independent Indias history says Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(250)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x