27 April 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट
x

Triveni Turbine Share Price | फक्त बँक FD मध्ये मन अडकवू नका! त्रिवेणी टर्बाइन शेअरने 3 वर्षात दिला 550% परतावा, डिटेल्स पहा

Triveni Turbine Share Price

Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड या पॉवर इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स 31 जुलै 2021 रोजी 62.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी हा स्टॉक 4 टक्के वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 550.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Triveni Share Price)

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात 58 टक्के वाढले आहेत. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 119 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.10 टक्के वाढीसह 398.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आपण जर त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअरचे तांत्रिक तपशील पाहिले तर आपल्या समजेल की, या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 50 पॉइंटवर ट्रेड करत आहे. या वरून कळते की हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सचा बीटा 0.8 अंकावर आहे, एका वर्षातील सर्वात कमी अस्थिरतेचे निर्देशक आहे.

त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स आपल्या 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.

जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या सात प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 55.84 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर शेअर बाजारातील 82,721 गुंतवणूकदारांनी कंपनीचे 44.16 टक्के म्हणजेच जवळपास 14.03 कोटी शेअर्स धारण केले आहेत. त्रिवेणी टर्बाइन कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत 58.81 टक्के वाढीसह 60.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 38.25 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जून 2023 या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत तब्बल 46.26 टक्के वाढ झाली असून कंपनीने 389.77 कोटी रुपये सेल्स नोंदवला आहे. तर जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 266.49 कोटी रुपये सेल्स केला होता. जून 2022 मध्ये त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअरचा EPS 1.18 होता, जो आता जून 2023 च्या तिमाहीत वाढून 1.91 वर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Triveni Turbine Share Price today on 03 August 2023.

हॅशटॅग्स

#Triveni Turbine Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x