उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा उल्हासनगर महापालिकेत मोठा ठेकेदार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून प्रदीप रामचंदानी यांनी फाईल चोरी केली. कपाटातून चोरलेली फाईल त्यांनी शर्टमध्ये टाकून पळ काढल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजप चांगलीच अडचणीत आली आहे. कारण प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक असून त्यांचा मुलगा उल्हासनगर महापालिकेत मोठा ठेकेदार आहे.
दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून १० मे रोजी उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरतानाचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलगा ठेकेदार असल्याने त्यासंबंधितच फाईल त्यांनी चोरली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरी प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
