14 December 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कल्याण पत्री पूल गर्डर लॉचिंग | अखेर आगामी KDMC महानगरपालिकेचा इव्हेन्ट पूर्ण

Shivsena, MP Shrikant Shinde, Kalyan Patri bridge, Gardere work

कल्याण, २३ नोव्हेंबर: दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.

हैदराबाद येथे तुळईच्या सांध्याच्या सुटय़ा भागांचे काम करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी हे सांधे पत्रीपूलाच्या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यांची जोडणी करून पूर्ण आकाराची तुळई तयार करण्याचे काम सुरू होते. तांत्रिक कौशल्यांचा वापर करून अवजड तुळई जागेवरून हलविण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. ७६.६३ मीटर लांबीची तुळई आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेने देखील याला मोठं इव्हेंटचं रूप दिल्याचं पाहायला मिळालं. पत्रीपुलाचं उर्वरित 10 टक्के गर्डर लॉचिंगचे काम काल रात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक येऊन सुरु झाले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते.

मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास सुरु झालेले गर्डर लाँचिंगचे काम पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण झाले. श्रीकांत शिंदे हे सकाळप्रमाणेच मध्यरात्रीही काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी हजर होते. खासदारांनी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

News English Summary: With the Kalyan Dombivli Municipal Corporation elections looming, the Shiv Sena has also turned it into a big event. The remaining 10 per cent girder launching work of Patripula started last night with a special block on the railway. The completion of the most difficult and equally important phase of the bridge, which was in its final stages, gave a sigh of relief to everyone, including the technical staff. Special mention should be made of MP Dr. Shrikant Shinde himself was present till the girder launching work was completed.

News English Title: Shivsena MP Shrikant Shinde made event of Kalyan Patri bridge Gardere work news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x