15 December 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार, राजकीय उन्माद दाखवणाऱ्या शिंदे गटातील आमदारचं बॅलेस्टिक अहवालाने भांड फुटलं

MLA Sada Sarvankar

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर दादर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार करण्यात आला होता. सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप असून, बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात ही गोळी सरवणकर यांच्या बंदूकीतील असल्याचं म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार आणि पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. प्रभादेवी जंक्शन येथे झालेल्या वादानंतर पुन्हा जोरदार राडा झाला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.

ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी झाली होती आणि दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी सुटली होती. त्यामुळे सरवणकर यांच्या विरोधात 15 सप्टेंबर रोजी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. पोलिसांनी या प्रकरणी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सरवणकर यांच्याकडी बंदूक जप्त करण्यात आली होती. बंदुकीसोबतच बंदुकीतून निघालेले काडतूसे आणि घटनास्थळावरून काही नमुने जप्त करण्यात आले होते. याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चौकशी केली. त्याचा अहवाल या तज्ज्ञांनी तयार केला आहे. या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp MLA Sada Sarvankar Dadar police station bullet firing ballistic report on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#MLA Sada Sarvankar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x