20 June 2021 10:30 PM
अँप डाउनलोड

गुगलने मला दोनवेळा नाकारल्यानेच फ्लिपकार्ट वेबसाइट उभी राहिली: बिनी बंसल

बेंगळुरू:  मी दोनवेळा गुगलला नोकरीसाठी माझा बायोडेटा पाठवला होता, परंतु दोन्ही वेळी मला गुगलने नाकारल होत आणि त्यामुळेच फ्लिपकार्ट वेबसाइट सुरु करू शकलो असं फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बंसल यांनी बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आयआयटी दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सारकॉफ या कंपनीत नोकरी केली. त्यानंतर अनुभवाच्या जोरावर मी गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी माझा दोनवेळा बायोडेटा पाठवला होता. परंतु दोन्ही वेळा नकारात्मक उत्तरच मिळालं होत असं ते म्हणाले. परंतु जर मला त्यावेळी गुगलने नोकरी दिली असती तर मी फ्लिपकार्ट वेबसाइट सुरु करण्याचा विचारही केला नसता अशी प्रांजळ कबुली सुद्धा बिनी बन्सल यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.

सारकॉफ नंतर बिनी बन्सल यांनी अमेझॉनमध्ये आठ महिने नोकरी केली आणि त्यानंतर अमेझॉनमधील त्यांचे मित्र सचिन बन्सल यांच्याबरोबर त्यांनी फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली. आज ही ई-कॉमर्स वेबसाइट देशातील सर्वात आघाडीची शॉपिंग वेबसाईट बनली आहे. नुकताच ‘वॉलमार्ट’ या अमेरिकन महाकाय रिटेल कंपनीने फ्लिपकार्टसोबत मोठा महत्त्वपूर्ण करारही केला आणि फ्लिपकार्ट आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x