29 April 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

भाजप सोबत गेल्याने अजित पवार गटाला निवडणुकीत मोठं नुकसान होणार, हे मुद्दे विधानसभा-लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरणार

Ajit Pawar

NCP Political Crisis | आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहातात यावरून संख्यांबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. बैठकीपूर्वीच आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादीचे नाशिक देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर हे पुन्हा शरद पवारांसोबत आले आहेत. यापूर्वी देखील जे आमदार अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते, त्यातील काही आमदार हे दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या गाडीत दिसून आले होते. मात्र आता भाजपसोबत गेल्याने पुढे अजित पवार यांचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल याचा राजकीय विश्लेषकांच्या अनुभवातून घेतलेला आढावा.

भाजपसोबत गेल्याने बहुजन समाजाची मतं गमावणार

अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने बहुजन समाजाची मतं गमावतील असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार खासदारांना याचा मोठा फटका बसेल आणि विधानसभा-लोकसभा अनेक जागा ते गमावू शकतात. भाजप-शिंदेगट आणि अजित पवार गटातील जागावाटपात नुकसान जरी अजित पवार गटातील उमेदवारांना होणार असेल तरी थेट भाजपच्या म्हणजे एनडीएच्या जागा कमी होतील असा त्याचा थेट अर्थ होतो.

भाजप-शिंदे गटाचा मतदार अजित पवार गटाकडे वर्ग होणार?

यापूर्वी शिवसेनेने नेहमीच भाजपवर आरोप केला आहे की भाजपाची मतं शिवसेनेकडे कधीच वर्ग होतं नाहीत. त्यात ठाकरेंपासून अलग झाल्यानंतर शिंदे गटाची राज्यातील एकूण मतं ५% झाल्याचं सर्व्हेत समोर आलं आहे. तसाच प्रकार आता अजित पवार यांच्या गटातील आमदार आणि खासदारांच्या बाबतीतही घडू शकतो असं राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. अजित पवारांच्या गटाच्या उमेदवारांना विधानसभा-लोकसभेच्या जागांवर शिंदे गट आणि भाजपचे मतदार मतं देतील का अशी शास्वती देता येणार नाही असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. अजित पवारांचं राजकीय भविष्य भाजपसोबत पुढे जाणं ही शिंदे गटासाठी धोक्याची घंटा असल्याने शिंदे गट अजित पवार गटाच्या विरोधात काम करेल असं म्हटलं जातंय.

राष्ट्रवादीची पारंपरिक मतं देखील पूर्णपणे मिळणार नाहीत…उलट,,

मुळात राजकीय फूट ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडली आहे. त्यामुळे अर्थातच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना राष्ट्रवादीची पारंपरिक मतं देखील पूर्णपणे मिळतील याची खात्री देता येणार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या सर्वच मतदारसंघात हेच पाहायला मिळेल असं म्हटलं जातंय.

काँग्रेसच्या पारंपरिक मतांचा फटका बसणार

अजित पवार यांनी आता भाजपसोबत गेल्याने त्यांचे समर्थक विधानसभा ते लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना सुद्धा गमावतील. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेहमीच आघाडीत निवडणूक लढवत आले आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, कारण आता अजित पवार गटाच्या वाटेला आलेल्या जागांवर काँग्रेस पक्षाची पारंपरिक मतं अजित पवार गटाला मिळणार नाहीत. तसेच शिंदे गट आणि भाजपाची मतं अजित पवारांच्या गटाला मिळतील याची कोणतीही शास्वती देणं शक्य नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या उमेदवारांना काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि आंबेडकरी गटाची मतं देखील मोठ्या प्रमाणावर मिळतील असं म्हटलं जातंय.

शरद पवार सोबत नसण्याचा फटका

स्वतः शरद पवार हेच सोबत नसल्याने अजित पवारांसाठी वेगळी राजकीय चूल मांडणं सोपं नाही. शिवसेनेच्या बाबतीत स्वतः बाळासाहेब ठाकरे हयातीत नसल्याने शिंदेंना काहीसा फायदा झाला. मात्र ते अजित पवारांच्या बाबतीत लागू होतं नाहीत. मोठे पवार आजही स्वतः मतदारसंघात फिरून वातावरण बदलू शकतात. सहकार क्षेत्रातील पकड आणि स्थानिक पातळीवर नेमकं काय करायचं हे मोठ्या पवारांना बरोबर ठाऊक आहे. पुढे पुढे ते अजित पवारांना अनेक ठिकाणी धक्के देतील असं देखील म्हटलं जातंय.

जनमानसात अजित पवारांची प्रतिमा मोठी नाही

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या नेत्याची जनमानसातील प्रतिमा कशी आहे. शरद पवार आणि ठाकरे कुटुंबीयांबाबत जनमानसात चांगली आणि आदराची प्रतिमा आहे. मात्र पवार कुटुंबातील असण्यापलीकडे जनमानसात अजित पवारांबद्दलची तशी प्रतिमा नाही हे वास्तव आहे. आज ‘धरण’ म्हटलं तरी लोकांना अजित पवार आठवतात. तसेच मागील साडेतीन वर्षात त्यांनी ३ वेळा राजकीय कोलांट्याउड्या मारत उपमुख्यमंत्रपद घेतलं आहे. तसेच शिवसेना फुटीनंतर पुन्हा वर्षभरात दुसरी फूट अजित पवारांनी केल्याने लोकांच्या मनात राजकारणाबद्दलच घृणा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यानमध्ये चांगली प्रतिमा असेलही, कारण जिथे सत्तेचा गूळ तिथेच मुंगळे जमा होतात हे जनतेलाही कळतं. मात्र जनमानसात अजित पवार यांची प्रतिमा चांगली नाही हे एक कटू सत्य आहे.

News Title : Ajit Pawar camp effect during election check details on 04 July 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x