15 December 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Viral Video | अत्यंत संतापजनक! दारूच्या नशेत दिव्यांग आदिवासी युवकावर लघवी केली, आरोपी भाजप आमदाराचा कार्यकर्ता

Viral Video

Viral Video | मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे एका व्यक्तीने दारूच्या नशेत एका दिव्यांग आदिवासी युवकावर लघवी केली. या लाजिरवाण्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून व्हिडिओची तपासणी केली जात आहे. व्हिडिओची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा भाजपशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

प्रवेश शुक्ला असे हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो मध्य प्रदेशातील सीधीचे भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ल यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. तो केदारनाथ शुक्ल यांचा प्रतिनिधी म्हणूनही काम पाहतो असं वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 9 कुबरी बाजारातून सांगितला जात आहे. या व्हिडिओमध्ये प्रवेश शुक्ला एका व्यक्तीला लघवी करताना दिसत आहे. संबंधित मुलगा हा आदिवासी समाजातील दिव्यांग असल्याचं समोर आलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपवर जोरदार टीका होत असून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आरोपींवर रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्यात येणार आहे असं म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, सीधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी तरुणासोबतच्या अशा घृणास्पद कृत्याला सभ्य समाजात स्थान नाही. आदिवासी अत्याचारात मध्य प्रदेश आधीच नंबर वन आहे, या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेशला लाजिरवाणे बनवले आहे, दोषी व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे असं ते म्हणाले.

News Title : Viral Video Madhya Pradesh BJP Karyakarta Pravesh Shukla urine on Adivasi boy check details on 04 July 2023.

हॅशटॅग्स

#Pravesh Shukla(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x