14 June 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

SBI Mutual Fund | होय! या म्युच्युअल फंड योजनेने गुंतवणूक 9 पट वाढवली, या स्कीममध्ये पैसा गुणाकारात वाढवा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | गुंतवणूक करताना आपला उद्देश्य नेहमी जास्तीत जास्त परतावा कमावणे हा हवा असतो. तुम्ही जितका अधिक काळ गुंतवणुक करत राहाल, तितका अधिक परतावा तुम्हाला मिळेल. चांगला परतावा हवा असेल तर, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जे चुकीच्या ठिकाणी गुंतवणुक केली तर तुमचे पैसे त्यात अडकतील. आजकाल झटपट पैसा वाढवून देणारी एकच योजना आहे, ती म्हणजे म्युचुअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल सध्या झपाट्याने वाढत आहे. तुमच्याकडेही चांगला म्युचुअल फंड असेल तर तुमचे पैसे झपाट्याने वाढू शकतात. (The NAV of SBI Small Cap Fund Direct Growth is ₹125.80 as of 10 Jan 2023)

SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक असून तिने आपल्या ग्राहकांसाठी अनेक म्युच्युअल फंड योजनाही सुरू केल्या आहेत. SBI ही सरकारी बँक असून आपल्या ग्राहकांसाठी “एसबीआय म्युच्युअल फंड” या नावाने म्युचुअल फंड योजना राबवते. SBI बँक आपल्या म्युचुअल फंड सेगमेंटमध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, मीडियम कॅप म्युच्युअल फंड आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड यासारख्या योजना राबवते. परताव्याच्या बाबतीत SBI म्युचुअल फंड योजना दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावून देतात.

9 पट अधिक परतावा :
SBI बँकेचे असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही अशा म्युचुअल फंड योजनेत SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकतो. एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकाळात गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावता येतो. आज या लेखात आपण अशा योजनेची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी अल्पावधीत लोकांना उत्तम परतावा कमावून दिला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप फंड :
गुड रिटर्न्स वेबसाईटच्या संशोधनानुसार, एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के सीएजीआर या दराने परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या फंडात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 10 वर्षांत तुम्हाला 9 लाख रुपयांचा जबरदस्त परतावा मिळाला असता. तसेच ज्या लोकांनी या म्युचुअल फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू केली होती, ते लोक आज करोडपती झाले आहेत.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात SIP पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागेल. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 5000 रुपये जमा करावे लागेल. SBI फोकस्ड इक्विटी म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के CAGR या दराने परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंडात 1 लाख रुपये जमा केले होते, त्यांना आता 5.28 लाख रुपये परतावा मिळाला आहे. दरमहा 5000 रुपयेची एसआयपी गुंतवणूक करणाऱ्यांचा लोकांना आता 15.5 लाख रुपये परतावा मिळाला असणार.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund Small Cap Fund scheme NAV check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x