Stock To Buy | शहाणे या बँक FD तुन 6-7% व्याज कमावतात, तर आर्थिक शहाणे याच बँकेच्या शेअरमधून 35% कमावणार, तुम्ही?

Stock To Buy | सध्या बाजारात चढ उतार कायम असताना, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधत असाल तर तुम्हाला लार्जकॅप बँकिंग स्टॉक वर लक्ष ठेवले पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी ICICI बँक च्या स्टॉकवर लक्ष ठेवा. अनेक ब्रोकरेज हाऊस फर्म ICICI बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत.
ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ICICI बँक स्टॉक नाविन्यपूर्ण आणि व्यवसाय परिवर्तनामध्ये आपल्या पियर्स बँकांच्या तुलनेत अनेक पावले पुढे आहे. बाजाराच्या पडझडीच्या आणि कठीण काळात ICICI बँकेची आर्थिक कामगिरी उत्साहवर्धक राहिली होती. बँकेच्या प्रत्येक व्यवसाय विभागात वाढ पाहायला मिळत आहे. बँकेची डिजिटल क्षमता अनेक पटींनी वाढत आहेत. या सर्व सकारात्मक बाबीत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बँकेच्या उच्च व्यवस्थापनमध्ये स्थिरता दिसून आली आहे. ICICI बँकेच्या शेअरने चालू वर्षात 22 टक्के आणि 1 वर्षात 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलचे मत :
ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फर्मचे म्हणणे आहे की, ICICI बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे, आणि त्यातून गुंतवणूकदारांनी भरपूर मोठा नफा कमावला आहे. ICICI बँकेची आर्थिक कामगिरी उत्कृष्ट आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ICICI बँकेने अपेक्षेपेक्षा खूप चांगले निकाल दिले होते. बँकेच्या स्टॉप व्यवस्थापनमध्ये स्थिरता दिसून येत आहे. बँकेचे बाजार भांडवल आणि बफर फंड देखील मजबूत आहे. ब्रोकरेज हाऊसने ICICI बँकेच्या स्टॉकवर बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी ICICI बँकेच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 1,170 रुपयेवरून 1,225 रुपये अपडेट केली आहे. सध्याच्या 931 रुपयांच्या बाजार भावानुसार ICICI बँकेच्या स्टॉकमध्ये खरेदी केल्यास 34 टक्के परतावा मिळू शकतो.
ब्रोकरेज फर्मच्या मते ICICI बँकेचे संपूर्ण लक्ष रिटेल आणि एसएमई उद्योगावर केंद्रित आहे. रिटेल बँकिंग सेक्टर आणि एसएमई बिझनेस बँकिंग हे बँक उद्योग विकासाचे मुख्य चालक घटक आहेत. बँक कॉर्पोरेट सेवांवरही लक्ष देत आहे. यातील सकारात्मक बाब म्हणजे ICICI बँक आता ‘बँक टू बँक’ टेकमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. ICICI बँकेने मागील काही वर्षांमध्ये सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. बँक व्यवस्थापनाचे लक्ष खर्च आणि जोखीम कमी करण्यासोबतच नफा वाढवण्यावर आणि अधिक महसूल संकलित करण्यावर आहे.
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालचे मत :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ICICI बँकेच्या स्टॉकसाठी 1150 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या किंमतीनुसार गुंतवणूक केल्यास हा स्टॉक तुम्हाला पुढील काळात 24 टक्के परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की बँक व्यवस्थापन आपली डिजिटल क्षमता आणि टेक्नोलॉजी वाढवत आहे. ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना उत्तम डिजिटल सेवा आणि उत्तम ग्राहक अनुभव देण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. बँकेचे मुख्य लक्ष PPOP च्या वाढीवर केंद्रित आहे. व्यवसाय परिवर्तनाच्या बाबतीत ICICI बँक आपल्या स्पर्धक बँकेच्या अनेक पावले पुढे आहे. आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये ICICI बँकेच्या कर्जात 20 टक्के CAGR वाढ अपेक्षित आहे. आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी बँकेचे RoA/RoE अनुक्रमे 2.1 टक्के / 17.2.टक्के राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| ICICI Bank Stock to Buy recommended by Motilal Oswal and MK global fund for new target price in short term on 07 December 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार 9000 रुपयांनी वाढणार, पहा कशी?
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
-
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
-
वादग्रस्त हिंदू महिला कार्यकर्ता चैत्रा कुंडपुरा'चा प्रताप, भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून 7 कोटी लुबाडले, पोलिसांकडून अटक
-
SBI Nation First Transit Card | एसबीआय बँक ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट! प्रवासाचा अनुभव बदलणार, खास कार्ड लाँच
-
महागाई-बेरोजगारीकडे दुर्लक्ष, सतत हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान-धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या, इंडिया आघाडी 'गोदी मीडिया'चा बॉयकॉट करणार