14 May 2021 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
x

त्या अटकेतील पाचही जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते

मुंबईत : पोलिसांनी अटक केलेल्या वर्णन गोन्सालविस, वरावर राव, अरुण फरेरा, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी म्हटलं असून त्यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरात तब्बल ९ ठिकाणी तडकाफडकी छापे टाकत ५ जणांना अटक केली होती. आज त्या अटकसत्राविषयी मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग आणि आयुक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली असता प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत पोलिसांनी अटकसत्रात हाती लागलेले पुरावे आणि त्यानंतर केली कारवाई या विषयी माध्यमांना प्राथमिक माहिती दिली. दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या कटाची तयारी करत असल्याचे तपासाअंती उघड झाले असं पोलिसांनी स्पष्ट केले. तपास यंत्रणेने पुरावे हाती लागल्यावरच त्या आरोपींना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आधारवरून अटक केले होते असं पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या झाडाझडती नंतर ईमेल, पत्रे, संगणक जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या संगणकाचे पासवर्डसुद्धा समजले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल फोरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे, तर संपूर्ण छापेमारीची व्हिडिओक्लिप देखील आमच्याजवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्यातील सुधा भारद्वाज यांनी कॉम्रेड प्रकाशला लिहिलेले पत्र आणि काही पत्रे देखील पोलिसांनी वाचून दाखविली. या ५ आरोपींचे काम सीपीआयएम’च्या सेंट्रल कमिटीस कळविण्यात यायचे. धक्कादायक माहिती हाताला लागली ती म्हणजे त्यांच्या पत्रात राजीव गांधी यांच्या घातपाताचा सुद्ध उल्लेख असल्याचे उघड झाले असं पोलिसांनी सांगितलं.

याच तपासादरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणी ५ लाख रुपये पुरविले असल्याचे उजेडात आले. तसेच सरकार उलथविण्याचा आणि देशात मोठी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे चौकशीअंती समोर आल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. आरोपींमध्ये मिलिंद तेलतुंबडे यांचासुद्धा समावेश असल्याचे तपासाअंती उघड झाले असल्याने हा सर्व माओवाद्यांचाच पूर्वनियोजित कट असल्याचे पुराव्याअंती स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हॅशटॅग्स

BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x