27 July 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

शिंदेंची ठाण्यात घराणेशाही! ठाकरेंच्या कृपेने एकनाथ शिंदे मंत्री, मुलगा खासदार आणि भाऊ नगरसेवक, मात्र घराणेशाहीची टीका ठाकरेंवर

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | देशात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. या नव्या संसद भवनावरून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावर काही लोक आक्षेप घेतात,हे दुदैव असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.

शिंदेंची घराणेशाहीवर टीका
घराणेशाहीत अडकलेल्या पक्षाना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद आणि सावरकरांचे वावडं असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून अशाप्रकारचा प्रयत्न होतोय. तसेच काही लोकांनी अशा अभिमानास्पद सोहळ्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय.परंतू नव्या संसद भवनाचा उद्धाटन सोहळा संपूर्ण देश पाहत असून देशातली 140 करोड जनता मोदींच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदेंच्या घरातील घराणेशाही
वास्तविक, एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लक्ष करताना घराणेशाहीचा आधार घेतला असला तरी शिंदेंच्या बाबतीतही ते तेवढंच सत्य आहे. कारण, ठाण्यातील खासदारकी, आमदारकी ते नगरसेवक पद हे एकनाथ शिंदे यांच्याच घरात आहेत हे वास्तव आहे. स्वतः एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या कृपेने आमदार आणि नंतर मंत्री झाले, त्यानंतर त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेतील इतिहास पाहिल्यास त्यांनी साधं शाखा अध्यक्ष पद देखील ठाण्यात भूषवलेलं नाही.

मात्र वडिलांच्या मार्फत त्यांनी ठाकरेंच्या आशीर्वादाने थेट खासदार होण्याची मजल मारली. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे हे देखील ठाण्यातून नगसेवक आहेत. त्यामुळे राजकारणातील सर्व म्हणजे मंत्रिपद, खासदार आमदार ते नगरसेवक पद शिंदेंच्या घरातच ठेवणे म्हणजे ठाण्यात दुसरे लायकीचे पदाधिकारीच शिल्लक नाहीत असंच समजायला हवं. याच विषयावरून शिंदेंच्या टिपणीवरून समाज माध्यमांवर त्यांच्यावर टीका होतं आहे.

News Title: CM Eknath Shinde criticized Thackeray Family check details on 28 May 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x