26 April 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

केंद्रात 'असे' सरकार येणार हे LIC'ला माहित असतं तर त्यांनी स्वतःचीच पॉलिसी काढली असती: आ. रोहित पवार

LIC, Modi Governement, NCP MLA Rohit Pawar

नगर: एलआयसीला माहिती असतं केंद्रात “असे’ सरकार येणार आहे, तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:चीच पॉलिसी काढली असती. इतकी वाईट स्थिती देशात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणली आहे. सर्वच क्षेत्राचे खासगीकरण केले जात आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी नोंदवली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “विरोधक या नात्याने अर्थसंकल्पावर टीका होते आणि सत्ताधारी असल्यानंतर अर्थसंकल्पाने गुणगान केले जाते, हा प्रकार एक सामान्य नागरिक म्हणून सवयीचा झाला आहे. पण वर्ष संपताना आपणाला लक्षात येते की वर्षाच्या सुरवातीला बजेटमुळे किती मोठी कात्री आपल्या खिशाला लागली आहे.

“गरिबांबद्दल सरकार काय विचार करते, हे बजेटमधून लक्षात येईल. छोट्या गुंतवणूकदारांना बजेटमध्ये काय देण्यात आले तर शून्य सोडून काही उरत नाही. शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यावर, सध्याच्या बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेले नाही. तरुणांच्या तोंडाला अप्रेंटिसशीपची पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं सांगून हमीभावाबद्दल बोलण्यात आलेलं नाही. आरोग्यासाठीच्या निधीत कपात केली आहे. कृषीचा विकास दर निच्चांकी आहे, त्याबाबत भरीव उपायोजना नाहीत.

काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये;

वाईट वाटतं पण LIC ला माहित असतं केंद्रात असे सरकार येणार आहे तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:ची पॉलिसी काढली असती. विरोधक या नात्याने अर्थसंकल्पावर टिका होते आणि सत्ताधारी असल्यानंतर अर्थसंकल्पाने गुणगान केले जाते हा प्रकार एक सामान्य नागरिक म्हणून सवयीचा झाला आहे. पण वर्ष संपताना आपणाला लक्षात येते की वर्षाच्या सुरवातीला बजेटमुळे किती मोठ्ठी कात्री आपल्या खिश्याला लागली.

हे वर्ष संपत असताना देशात मंदीचे लोट येतील, बेरोजगारी वाढेल आणि अराजकतेची स्थिती निर्माण होईल अस चित्र आहे. सत्ताधारी म्हणून समर्थन आणि विरोधक म्हणून टिका करण्यापेक्षा तटस्थपणे बजेटकडे पाहिल्यास “गंडवागंडवीचा” सरकारचा प्रकार लक्षात येतो. ५ लाखांपर्यन्तच्या ठेवी सुरक्षित असतील हे सांगायची वेळ येत असेल तर बॅंकींग प्रणाली कुठल्या स्थितीतून जात आहे हे लक्षात येईल.

इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये सवलत दिल्याचं भासवलं असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करुन टॅक्स मध्ये बेनिफिट घेणाऱ्यांना यापुढे तो मिळणार नाही. याला एका हाताने देणं आणि दुसऱ्या हाताने काढून घेणं असंच म्हणावं लागेल.

लोककल्याणकारी योजनांचे बजेट कमी करु वाटते यातून गरिबांबद्दल सरकार काय विचार करते ते लक्षात येईल. छोट्या गुंतवणूकदारांना बजेटमध्ये काय देण्यात आले तर शून्य सोडून काही रहात नाही. शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्मीती करण्यावर, सध्याच्या बेरोजगारीवर भाष्य करण्यात आलेले नाही. तरुणांच्या तोंडाला अप्रेंटिशीपची पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं सांगून हमीभावाबद्दल बोलण्यात आलेलं नाही. आरोग्यासाठीच्या निधीत कपात केली आहे. कृषीचा विकास दर निच्चांकी असून त्याबाबत भरीव उपायोजना नाहीत. शून्याचा शोध आर्यभट्ट लावला हा इतिहास आहे त्याचप्रमाणे लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावाने जोडला जाईल.

 

Web Title:  NCP MLA Rohit Pawar says if LIC may aware about Modi government then they could protected with own policy.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x