19 January 2022 1:03 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्रात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड, सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान

Loksabha election 2019, marathwada, 10 seats, bjp, congress, shivsena, bahujan vanchit aaghadi

आज महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. परंतु बऱ्याच ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाडीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि पर्यायी लोकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागले. बरेच लोक रांगा पाहून पुन्हा मतदान न करता घराकडे वळाले आणि याचा एकंदरीत परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला.

मराठवाड्यात १० लोकसभा मतदार संघासाठी १५ कोटी ७९ लाख ३४ हजार नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 215 व 235 वरील मतदान यंत्र बंद पडल्याने नवीन यंत्र बसविण्यात आले. या ठिकाणी जवळपास अर्धा तास मतदार खोळंबळे होते आणि मानवत तालुक्यातील सावरगाव येथील मतदान केंद्रावरील एक मशीन अर्धा तासापासून बंद होते.

हॅशटॅग्स

#Election2019(13)#ElectionSlot2(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x