14 April 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक

Bharat Bandh, Against farm bills, Across the country, Marathi News ABP Maza

चंदीगड, २४ सप्टेंबर: केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे पारीत केलेल्या कषी बिल (Central Government Farm Bills) विरोधात देशभरात आवाज उठवला जात आहे. संसदेमध्ये या बिलास विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयक संसदेत सरकारने मंजूर केली. आता या बिलाचा विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बिलाला विरोध करण्यासाठी 25 सप्टेंबरला म्हणजे उद्याच ‘भारत बंद’ (Bharat Bandh) घोषीत करण्यात आला आहे. उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरीही सहभागी झाले आहेत.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ही बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनाही उद्या (25 सप्टेंबर) ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होणार आहेत. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या संघटनेसह इतरही काही संघटना उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने 25 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने 25 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमराराम यांनी म्हटले आहे की, समन्वय समितीमध्ये 237 पेक्षा अधिक शेतकरी संघटना सहभाही आहेत. या संघटना देशभरात आपापल्या पातळीवर भारत बंदचे आयोजन करतील. यात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड,कर्नाटक या राज्यांसह देशभरातील इतरही राज्यांतील शेतकरी या बंदमध्ये सहभागी होतील.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांसाठी अत्यांत नुकसानकारक आहे. तरीही हे बिल शेतकरी हिताचे असल्याचे सांगत केंद्र सरकारने हे विधेयक मंजूर केले असा प्रमुख आक्षेप शेतकरी संघटनांचा आहे.एका बाजूला विज, इंधन दर, शेती अवजारं, खतं आदींच्या किमती वाढत आहेत. त्या तुलनेत शेती मालाला भाव मिळत नाही. असे असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार मागच्या दाराने शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणने आहे.

 

News English Summary: Despite the passage of agriculture reform bills in Parliament, the protests in Haryana continue with several organizations gearing up to support the Bharat Bandh call on September 25. Farmer leaders said that several farmer organizations like Bharatiya kisan union (BKU), all India farmers union (AIFU), all India kisan sangharsh coordination committee (AIKSCC), all India kisan mahasangh (AIKM) have come on a common platform for the nationwide shutdown.

News English Title: Bharat Bandh against farm bills on tomorrow 25th September across the country Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x