8 December 2021 6:22 PM
अँप डाउनलोड

मुली पळविण्याचा कटात सामील आहे का भाजप सरकार? : राम कदमांविरोधात मनसेची पोश्टरबाजी

मुंबई : भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी केली आहे.

मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू आणि तुम्हाला देऊ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने जोरदार बॅनरबाजी केली आहे. मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा बॅनर लावले आणि निषेध नोंदवला आहे. परंतु हे बॅनर पहाटे पोलिसांनी हटवले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त सकाळी प्रसिद्ध झाले.

राम कदमांच्या वादग्रस्त विधानाने त्याच्यात राम नाही तर रावण असल्याच मनसेच्या पोश्टरमध्ये दाखविण्यात आलं आहे. भाजप आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले होते. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदमांनी म्हटले होते.

काय म्हटलं आहे मंत्रालयासमोरील पोश्टरवर, ‘वाह रे भाजपा सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार, मतदारांनो आपल्या मुलीला सांभाळा. स्वयंघोषित दयावान आणि डॅशिंग भाजपा आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहेत. जर आमदार किंवा त्यांच्या समर्थकांनी असे केले तर पोलिसांकडे तक्रार करा आणि आम्हालाही कळवा’, असे या बॅनरवर म्हटले आहे.

त्यामुळे राम कदम यांच्या विरोधात सर्वच थरातून विरोधाचा जोर वाढताना दिसत आहे. त्यांची एकूण राजकीय धोक्यात आल्यास गैर वाटायला नको. कारण निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण राज्य भाजपच आमदार राम कदमांमुळे अडचणीत आली आहे.

 

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x