18 April 2024 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न - चंद्रकांत पाटील

Chief Minister Uddhav Thackeray, Pune, Ajit Pawar, BJP State President Chandrakant Patil

पुणे, २५ जुलै : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखणे हे दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणांसाठी मोठेच आव्हान ठरत आहे. रुग्णसंख्येला निर्बंध घालावा तर कसा याचे आकलन न झाल्यामुळे सर्वत्र संभ्रमाची परिस्थिती दिसून येत आहे. त्याच संभ्रमावस्थेतून लागू करण्यात आलेल्या मागील दहा दिवसांच्या टाळेबंदीत पुणे जिल्ह्य़ात थोडेथोडके नव्हे तर २२,१६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यांमध्ये पुणे शहरातील १२ हजारांहून अधिक तर पिंपरी चिंचवडमधील सहा हजार रुग्णांचा समावेश आहे.

पुणे शहरात करोनाचे वेगवान निदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचण्या सुरू करण्यात आल्यानंतर शहरातील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४ ते २३ जुलै दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये टाळेबंदी पुकारण्याची घोषणा केली.

पुण्यातील बिघडत्या परिस्थितीचा फायदा घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करुन अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले, असं दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळात पुणेकरांना आश्वस्त करणार का? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इतर कुणाला मुलाखत दिली नाही, फक्त सामनालाच दिली. आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्नही करत नाही, तरीही ते सारखं तेच का सांगत आहेत? ते साप समजून भुई थोपटत आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

 

News English Summary: Isn’t Chief Minister Uddhav Thackeray trying to show how Ajit Pawar failed in Pune by ignoring Pune? This question has been asked by BJP state president Chandrakant Patil.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray ignoring Pune to show Ajit Pawar unsuccessful ask BJP State President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x