17 November 2019 9:36 PM
अँप डाउनलोड

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाला महापौर बंगला येथे गणेशपुजनाने सुरुवात झाली. मुख्यमंत्री तसेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते यावेळी गणेशपुजन पार पडले. दरम्यान, या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्षाच्या खासदार पुनम महाजन, मुंबईचे महानगर पालिकेचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि समस्त उद्धव ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी महापौर बंगल्याच्या हस्तांतरणाची अधिकृत कादगपत्रे फडणवीसांच्या हस्ते शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आता अधिकृतरित्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाला जोरात सुरुवात होणार आहे.

आज म्हणजे दिनांक २३ जानेवारी स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांची ९३वी जयंती आहे. या निमित्तानेच आज अनेक कार्यक्रम पार पडले. कालच राज्य मंत्रीमंडळाने कॅबिनेट बैठकीत सदर स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूरी केला होता.

हॅशटॅग्स

#Shivsena(741)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या