19 October 2021 8:59 AM
अँप डाउनलोड

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रियांका गांधींवर पक्षात मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची राष्ट्रीय काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधींकडे युपीच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युपी’च्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रियांका गांधी आतापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय राजकारणापासून नेहमीच दूर होत्या. त्यांच्याकडे काँग्रेस पक्षात कोणतंही अधिकृत पद नव्हतं. परंतु, आता राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या युपी’ची जबाबदारी सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीत काँग्रेस सुद्धा स्टार प्रचारकांची फौज उतरवण्याच्या तयारीत होतं आणि त्याप्रमाणेच सर्वकाही घडताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Congress(524)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x