22 August 2019 11:56 PM
अँप डाउनलोड

तुमचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ; आमचा झेंडा दिसला तरी 'दांडा वर' : मनसेकडून खिल्ली

तुमचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ; आमचा झेंडा दिसला तरी ‘दांडा वर’: मनसेकडून खिल्ली

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले.

मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचं ओळखपत्र दाखवून देखील टोल नाक्यावर टोलमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. यावर कार्यकर्त्यांना उत्तर देताना सुरेश हाळवणकर यांनी सांगितलं की, “हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्या कारणाने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते, आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. आमदार,नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं असा विचार करुन ते सोडून देतात”.

मात्र सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या नेत्यांकडे टोलनाक्यावरील कैफियत मांडली असली तरी समाज माध्यमांवर महाराष्ट्र सैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलचा झोल बाहेर काढत त्याला अनुसरून राज्यभरातील टोल नाक्यांविरुद्ध आंदोलन छेडलं होतं आणि त्यानंतर तब्बल सामान्यांची लूट करणारे तब्बल ६५ टोलनाके राज्य सरकारला बंद करण्याची वेळ आली होती. तसेच आंदोलनादरम्यान अनेक टोलनाके फोडण्यात आले होते आणि टोलनाक्यांवर मनसेची चांगलीच दहशत तेव्हा पासूनच पाहायला मिळते. अगदी ज्या गादीवर किंवा गाडीच्या आतमध्ये मनसेचा झेंडा दिसतो तेव्हा टोलनाक्यावर कोणताही प्रश्न न करता गाडी आजही सोडण्यात येते. त्यामुळेच मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची खिल्ली उडवताना ‘तुमचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ; आमचा झेंडा दिसला तरी ‘दांडा वर’ असं म्हणत भाजपाची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या