मुंबई: काही दिवसात प्रसार माध्यमातून स्क्रुटिनचा प्रकार धुमाकूळ घालतोय. एनएसआय कंपनीमार्फत देशातल्या काही लोकांच्या माहिती काढल्या जात आहेत, गुजरातमध्ये मागच्या काळात घेडलेला हा प्रकार घडला होता, आता इतर ठिकाणीही घडतोय ही चिंतेची बाब आहे. चौदाशे लोक फेसबुकवर आहेत ज्यांच्यावर यावरून नजर होती. सॉफ्टवेरमार्फत पाळत ठेवली जाते हे फेसबुकने आधी सांगितले होते. याबाबत संपूर्ण माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती, याबातची मीहिती केंद्र सरकारने सर्वांसमोर आणावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो. पण पत्रकार, दलित संघटनेचे नेते आणि बुद्धिजीवींवर पाळत ठेवण्याचं कारण काय, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हेरगिरी करणाऱ्या एजन्सीनं आपण याबद्दलचं तंत्रज्ञान केवळ सरकारला विकत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून झालेली हेरगिरीमागे सरकारचा हात असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याच देशाच्या नागरिकांवर ठेवली जाणारी पाळत ही मागच्या दारानं येणारी हुकूमशाही असल्याचा दावा त्यांनी केला. हेरगिरीसाठी आवश्यक असणारं स्पायवेअर आम्ही फक्त सरकारला देतो, असा संबंधित कंपनीचा दावा आहे. त्यामुळे हेरगिरी कोणी केली हे उघड आहे. यावेळी बोलताना एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. गुजरातची संस्कृती देशभरात नेण्याचा प्रयत्न सध्या काहींकडून सुरू आहे. संजय जोशी कोण होते, त्यांचं पुढे काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यावेळी जे जोशींसोबत झालं, तेच आता व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू आहे, असं आव्हाड म्हणाले.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ही हुकूमशाहीच: राष्ट्रवादी काँग्रेस