3 August 2020 2:14 PM
अँप डाउनलोड

भारतातील निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध; फेसबुकडून विशेष खबरदारी

नवी दिल्ली : जगभरातील मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकांमध्ये म्हणजे अगदी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच भारतात सुद्धा त्याचे मोठे पडसाद उमटले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध झालं असून त्यांनी त्यांच्या जगभरातील टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

भारतातील निवडणुकीत ७२ कोटीहून सुद्धा जास्त मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष थेट मतदाराकडे पोहोचण्यासाठी फेसबुकचा वापर करतील याची शक्यता लक्षात घेऊन फेसबुक उच्चस्तरीय काळजी घेताना दिसत आहे आणि त्यासाठी जगभर असलेल्या टीमला सज्ज करण्यात आलं आहे. स्वतः फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सैंडबर्ग त्यावर लक्ष ठेऊन असणार आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना फेसबुकच्या व्यवस्थापक केटी हार्बट यांनी सांगितले की, भारतातील निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मार्क साऱ्या घटनाक्रमावर नजर ठेऊन आहेत अशी माहिती दिली. तसेच फेसबुकच्या भारतातील कर्मचाऱ्यांबरोबरच कॅलिफोर्निया येथील मेन्लो पार्कच्या मुख्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांची टीम लोकसभा निवडणुकीवेळी भारतात तळ ठोकून काम करणार आहे.

फेसबुकवर २०१६ मध्ये अमेरिकेच्या निवडणुकीसह अन्य निवडणुकांना प्रभावित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी गजभरात खळबळ माजली होती तसेच त्यासंबंधित खटले सुद्धा अमेरिकेत सुरु आहेत. विशेष म्हणजे फेसबुकवर खासकरुन अमेरिकेतील आणि भारतातील करोडो मतदात्यांच्या माहितीशी छेडखानी केल्याचाही आरोप फेसबुकवर करण्यात आला होता.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#facebook(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x