25 April 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? - सविस्तर

BJP Anti Pankaja Munde politics, MLA Suresh Dhas, Marathwada Beed

बीड, २८ ऑक्टोबर : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

काल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या /प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाला बळकटी देण्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजना याबाबत सविस्तर सादरीकरण केले. राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळातून च्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले.

दरम्यान, पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे या शरद पवारांच्या कामाने प्रभावित झाल्या आहेत .त्यांनी एक ट्विट करून शरद पवारांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे.शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे त्यांनी कौतुक केले आहे. पंकजा मुंडेंनी ट्विट केले आहे की, @PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे’.त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या ट्विटनंतर नवीन राजकीय समिकरणे पाहायला मिळणार का अशा चर्चा सुरू झाली आहे.

तत्पूर्वी बीडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आयात करण्यात आलेले आमदार सुरेश धस यांना ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून भाजपमधील वरिष्टांनीच नैतृत्व करण्याची बळकटी दिल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. पंकजा मुंडे परदेशात असताना याबाबत घटना घडल्याचं म्हटलं जातं आहे. परिणामी, खडसेंच्या राजकीय जीवनाच्या बाबतीत दूरगामी परिणाम करणारं जे राजकारण फडणवीसांच्या कालखंडात घडलं ते पंकजा मुंडे यांच्या बाबतीत देखील घडण्याची शक्यता हा प्राथमिक घटनाक्रम सांगतो आहे.

पंकजा मुंडे आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी असल्या तरी फडणवीसांपुढे त्यांचे अधिकार किती ग्राह्य धरले जातील याबाबत राजकीय विश्लेषकांना देखील शंका आहे. बीडच्या भाजपात सध्या घडणाऱ्या घटना याची कल्पना न येण्याइतक्या पंकजा मुंडे देखील छोट्या राजकारणी नक्कीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं दिलेली हाक आणि बीडच्या राजकारणी असून देखील मुंबईतील शिवाजीपार्क मैदान गाजवण्याची बोलून दाखवलेली इच्छा बरंच काही सांगून जाते. त्यामुळे फडणवीस गट उत्तर महाराष्ट्रातील स्पर्धक संपविण्यासाठी जसे छुप्यामार्गाने पुढे होते, तसेच आता भाजपच्या मराठवाड्यातील राजकारणात छुपे मार्ग शोधून रणनीती आखात असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत काय राजकारण शिजणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: Political analysts say that MLA Suresh Dhas, who was imported into the BJP in the run-up to the elections in Beed, was empowered by senior BJP leaders to take up the issue of sugarcane workers. It is said that the incident took place while Pankaja Munde was abroad. As a result, the politics that took place in the time of Fadnavis, which had a far-reaching effect on Khadse’s political life, is likely to happen in the case of Pankaja Munde as well.

News English Title: BJP Anti Pankaja Munde politics in Marathwada Beed News Updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x